जालना/प्रतिनिधी,दि.1
जालना जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी जालना, अंबड, भोकरदन व परतूर यांच्यामार्फत सुरू असलेल्या पोलीस पाटील भरती-2025 कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची ‘शेवटची तारीख 30 सप्टेंबर, 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील पुरपरिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करून अर्ज करण्याची मुदत गुरुवार, 2 ऑक्टोबर, 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत अधिकृत सूचना जिल्हा प्रशासनाच्या www.jalna.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असुन, परिक्षार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.



