pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बदनापूर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजनाची बैठक संपन्न.

0 1 1 8 0 4

जालना/प्रतिनिधी, दि.25

बदनापूर- येथे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक गट साधन केंद्र पंचायत समिती बदनापूर येथे पार पडली. यामध्ये सन 2023 24 मध्ये होणाऱ्या 14 वर्षाखालील 17 वर्षाखालील व 19 वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या दहा खेळांच्या स्पर्धा या तालुका पातळीवर खेळल्या जाणार असून त्यांचे नियोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी श्री क्षीरसागर डी एन तर प्रमुख उपस्थिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर साहेब तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद सर तसेच क्रीडा अधिकारी रेखा परदेशी मॅडम व राज्य क्रीडा मार्गदर्शक खो-खो संतोषजी वाबळे सर, मुख्याध्यापक प्रतिनिधी श्री प्रल्हाद वाघ, तालुका क्रीडा संयोजक श्री यशवंत जगदाळे उपस्थित होते. या बैठकीत खेळा संबंधीच्या विविध बाबी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध अनुदान योजना तसेच क्रीडा पुरस्कार व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक 1 सप्टेंबर पासून तालुकास्तरीय खेळांना सुरुवात होणार आहे या बैठकीस तालुक्यातील विविध माध्यमिक जिल्हा परिषद प्रशाला आश्रम शाळा इंग्लिश मीडियम तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. यावेळी या बैठकीचे सूत्रसंचालन श्री सचिन मोहिते यांनी केले तर तर आभार प्रदर्शन श्री सातपुते अमोल यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 4

Related Articles