pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उद्या जालना येथे (11 ऑक्टोबरला) प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन बेरोजगारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.10

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्यमार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे बुधवार दि.11 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले आहे.
मेळाव्यासाठी भूमी कोटेक्स इंडिया, प्रा. लि. जालना यांची पदवीधर (बी.कॉम/एम.कॉम) पदवीधर उत्तीर्ण अकाऊंटंट साठी 3 पदे, कोणतीही पदवीधर साठी सुपरवायझर 2 पदे आयटीआय फिटर,वेल्डर आणि आयटीआय इलेक्ट्रिकल साठी 14 पदे, दहावी/ बारावी हेल्पर साठी 4 पदे आणि स्नेहश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट लि.जालना यांची पदवीधर (बी.कॉम/एम.कॉम) पदवीधर उत्तीर्ण क्लर्क आणि कॅशिअर साठी 7 पदे, दहावी बारावी पास/नापास साठी पिग्मी एजंट 4 पदे अशी एकूण 34 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.
जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-7 जालना याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आदि कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायांकित प्रतीचा संच सोबत ठेवून बुधवार दि. 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपस्थित रहावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे