सुरंगळी येथील जि.प. शाळेत प्रवेशोत्सव साजरा

भोकरदन/प्रतिनिधी, दि.18
भोकरदनः तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरंगली येथे शाळेत दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व बूट वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोळुंके सर
यांनी प्रास्ताविक करुन
विद्याथ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक सपकाळ सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णु दांडगे , गावातील प्रतिष्ठित नागरीक संतोष काळे , मंदाताई संजीव पाटील अंगणवाडी सेविका , यांच्या हस्ते मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकाचें वाटप करण्यात आले. उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचें स्वागत करण्यात आले.अंभोरे सर , राठोड सर, बावस्कर सर, गांगे सर , सोळुंके सर , गिरी सर , यांच्यासह ग्रामस्थ तसेच शाळेचे सर्व शिक्षकवृंद आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन सोळुंके सर यांनी केले आणि मुख्याध्यापक सपकाळ यांनी आभार मानले.



