pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कळंबूसरे ग्रामपंचायतच्या हद्दीतील विकासकामात भ्रष्टाचार झाल्याने त्यांची चौकशी करण्याची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी.

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16

उरण तालुक्यातील कळंबूसरे ग्रामपंचायत तर्फे विविध विकासकामे सुरु असून अनेक विकास कामे झाले नसताना त्या विकास कामांचे कोणतेही पुरावे नसताना परस्पर ग्रामनिधी हडप केल्याचा आरोप काळंबुसरेचे ग्रामपंचायतचे सदस्य नितीन पांडरंग केणी यांनी केला आहे. कामे केले नसतानाही निधी हडप केल्याने कळंबुसरे ग्रामपंचायत ग्रामनिधीच्या भ्रष्टाचारची व लहान मुलांची दफन भूमी साफसफाई भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सविता मनोहर नाईक नितीन पांडुरंग केणी, अश्विनी तळीराम नाईक, स्वप्नाली महेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी रायगड,विशेष कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

लहान मुलांची स्मशान भूमी साफ सफाई हे काम १० ते १५ हजाराचेच काम आहे.परंतु या कामाचे ४७,२५० रुपये लावून ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत साधून ग्रामनिधी हडप केला. ह्या कामाचं मासिक सभेचा ठराव नाही काम चालू करण्या अगोदरचे फोटो नाहीत, काम चालू केल्यावरचे फोटो नाहीत, जे फोटो जोडले गेलेत ते खोटे आहेत असे स्वतः सरपंच एका पत्राद्यारे कबूल करतात. कचरा कुठे टाकला हा पुरावा नाही. एकाच दिवसात सकाळी ९ ते १५ एकाच गाडीच्या १८ फेऱ्या होतात, दुसऱ्या दिवसात १७ फेऱ्या आणि तिसऱ्या दिवसात १० फेऱ्या हे सगळं बघून संशय निर्माण होतो.तसेच कळंबुसरे नावाचे बोर्ड सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी फुकट दिले, तरी त्या कामाचे ३,९६० रुपये लावले जातात. अशा प्रकारे काहीतरी दाखवून निधी लाटण्याचा काम चालू आहे.असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.

—————————————————

माझ्याकडे सदर अर्ज आला आहे. मी विस्तार अधिकारी विनोद भिंडे यांना कळंबूसरे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पाठविले आहे. ते सर्व माहिती घेत आहेत. त्यांना सर्व सखोल माहिती घेउन माहिती दोन ते तीन दिवसात कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्या नंतर दोन्ही बाजूच्या व्यक्तींना, ग्रामपंचायत सदस्यांना बैठकीसाठी बोलविण्यात येणार आहे.
– समीर वठारकार
गटविकास अधिकारी, पंचायत समिती उरण.

 

कळंबूसरे ग्रामपंचायत मध्ये विविध विकासकामे सुरु आहेत. मात्र कोणत्याही विकास कामात भ्रष्टाचार झालेला नाही. सर्व कामे शासकीय नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुरु आहेत. आम्ही चांगले काम करीत असल्याने काही व्यक्ती बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. कळंबूसरे ग्रामपंचायतचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे.
– उर्मिला नाईक, सरपंच, ग्रामपंचायत कळंबूसरे.

विस्तार अधिकारी विनोद मिंढे हे या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. कोणत्याही कामात भ्रष्टाचार झालेला नाही. जे काही कामे केलीत त्याची सर्व कागदपत्रे व त्या कामाची संपूर्ण माहिती विस्तार अधिकारी विनोद मिंढे यांना देण्यात आलेली आहे.
– स्वाती पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कळंबूसरे.

कळंबूसरे ग्रामपंचायतचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे. ग्रामपंचायत जनतेच्या कल्याणासाठी चांगले काम करत आहे.चांगले काम करीत असल्यामुळे काही जण ग्रामपंचायतच्या चांगल्या कारभाराला विरोध करत आहेत.
– निनाद नाईक, ग्रामस्थ, कळंबूसरे.

जानेवारी २०२३ ते जून २०२३ पर्यंत ग्रामपंचायत कळंबुसरे ग्रामनिधीत २५ ते ३० लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचं संशय आहे. आम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी विचारना केली असता दुर्लक्ष केला जातो.किंवा मासिक सभेला कुठल्याही विषयावर गोंधळ करुन सदस्यांचे लक्ष विचलित करून ठराव पास केले जातात.व जमा खर्चाला मान्यता दिली जाते. तसेच काही कामांची खोटी माहिती पुरवली जाते.
– नितीन केणी, ग्रामपंचायत सदस्य, कळंबूसरे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे