तहसील कार्यालयावर शिवसेनेचे धरणे..

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.8
जाफराबाद तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने दि.०८ रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमुक्त करत ओला दुष्काळ जाहीर करत तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी या मागण्यासाठी धरणे आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावर्षी महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी मुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतलेला आहे, तसेच राज्यात पडलेल्या ढगसदृष्य पावसामुळे नद्यांना पुर आल्यामुळे नदीवर बांधण्यात आलेले लहान मोठे संपुर्ण तलाव १०० टक्के भरुन तलावासाठी संपादीत झालेल्या शेतजमीनच्या व्यतिरिक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे तलावाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पीके वाहन गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर पासवासामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाला असुन. या नैराश्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने निवेदणावरील मागण्या मान्य करणे गरजेचे आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश पा. गव्हाड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे,तालुका प्रमुख कुंडलिक पा.मुठ्ठे,युवा उपजिल्हाधीकरी मंगेश गव्हाड,जेष्ठ शिवसैनिक हरीचंद्र म्हस्के, विष्णू लोखंडे, भागवत घोडके,इरफान नेता, दिनकर मिसाळ,अशपाक कुरेशी,समीर शहा,राजेंद्र वानखेडे,देवीसिंग बायस, समाधान सवडे,संतोष वायाळ,गणेश वायाळ, गजानन मुळे,विनोद शेळके, राज देशमुख,गोविंदा माकोडे, अमोल नरवडे,गणेश जंजाळ, अमोल जंजाळ,एकनाथ परिहार,सुभाष परीहार,अरुण काकडे,सुभाष परीहर, गजानन कदम,शेख सलमान, नंदू गायकवाड,लक्ष्मण काळे, अमोल पंडित,यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते…

