ब्रेकिंग
अल्पपोहार व भोजन व्यवस्थेसाठी निविदा भरण्याचे आवाहन
0
3
0
4
8
9
जालना/प्रतिनिधी,दि. 29
शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी अल्पपोहार व भोजन व्यवस्था व इतर बाबींचा पुरवठा करण्यासाठी अनुभवी व सुयोग्य अभिकर्त्याकडून विहित नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीव्दारे मागविण्यात आलेली आहे. सदर ई- निविदा भरण्याचा कालावधी दि. 28.08.2023 ते दि. 04.09.2023 पर्यंत आहे. सदर ई-निविदा www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी ईच्छूक पुरवठादारांनी सदरची निविदा विहित कालावधीत भरण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगीता सानप यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
0
3
0
4
8
9