pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मजबुत संघटन बांधणी करुन नव्या जोमाने कामाला लागा – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

0 3 1 5 3 1
जालना/प्रतिनिधी,दि.14
कोणी पक्षातून गेल्याने पक्ष संपत नसतो.
पक्षाने अनेक वादळे पाहिली असून त्यानंतर पक्ष पुन्हा मजबुतीने वेळोवेळी उभा राहिलेला आहे. पक्षातील काही लोकांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने पक्षातील जुने निष्ठावंत पदाधिकारी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात येणार्‍या सर्व निवडणुकां पक्ष अत्यंत नियोजनबध्द व ताकदीने लढणार  असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
जालना शहरातील मस्तगड येथील शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आयोजित केलेल्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या
प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आज १४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील मतदार संघनिहाय रिक्त पदाधिकार्‍यांच्या माहितीचा
आढावा घेण्यात आला. तसेच घनसावंगी, मंठा, परतुर, जालना येथील रिक्त पदावर प्रभारी तालुकाप्रमुखांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. यावेळी
व्यासपीठावर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक
भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, मुरलीधर शेजुळ, भगवानराव कदम, रमेश गव्हाड, बाबुराव पवार, हनुमान धांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित
होते.या बैठकीत पदाधिकार्‍यांशी पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकी अगोदर व नंतर अनेक
पदाधिकार्‍यांनी पक्ष सोडला. परंतु कोणी पक्षातून बाहेर पडल्याने शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्ष बांधणी
करुन मजबुतीने उभे राहावे, असे आवाहन केले. यावेळी बोलतांना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले की, पक्षांतराने रिक्त झालेल्या पदाधिकार्‍यांच्या
जागा तात्काळ भरल्या जाणार असून पक्ष संघटन मजबुत केले जाईल. पक्षात अनेक निष्ठावंत इच्छुकांची मोठी यादी आहे. संघटनेतील प्रत्येक पदाधिकार्‍यांस
न्याय देण्याची भुमिका पक्षाची असल्याने आगामी काळातही येणार्‍या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांत अनेकांना संधी दिली जाणार असून त्यांनी आपल्या
आपल्या कार्यक्षेत्रात पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, नागरिक व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला
लागण्याचे आवाहन केले.बॉक्समध्ये घेणे
आगामी काळ पक्षासाठी उज्वलच – जिल्हाप्रमुख अंबेकर
यावेळी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पराभुत
झाले असले तरी जिल्ह्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणावर त्यांना मतदान केले.
हे आपणास विसरुन चालणार नाही. जिल्ह्यात अनेक मतदार संघात बंडखोर्‍या झाल्या तरी सामान्य नागरिक पक्षाच्या विचारधारेला मानणारा असल्याने
त्याने पक्षाला भरभरुन मतदान केले. नुकत्याच घडलेल्या काही पक्षांतराच्या घडामोडीमुळे शिवसैनिकांनी खचून न जाता सामान्य नागरिक, शेतकर्‍यांच्या
प्रश्नांवर संघर्ष करावा व ते सोडविण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करावेत, एकजुठीने काम केल्यास आगामी काळ पक्षासाठी
उज्वलच असेल असेही जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर म्हणाले.यावेळी माजी सभापती अशोकराव आघाव, देवनाथ जाधव, महिला आघाडीच्या मंगल
मेटकर, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, अशोक बर्डे, कुंडलिक मुठ्ठे,शहरप्रमुख बाला परदेशी,घनश्याम खाकीवाले, विनायक चोथे,गणेश काळे, मधुकर
साळवे, कुमार रुपवते, नंदकिशोर पुंड, संदीप कंटुले, प्रदीप बोराडे,जे.के.चव्हाण, प्रभाकर उगले, पंडीत क्षिरसागर, रामजी गायकवाड, राजु जाधव,
संदीप मगर, कारभारी म्हसलेकर, बबनराव मिसाळ, शंकर बेंद्रे, विष्णुपंत गिराम, परमेश्वर चंद, तुळशीदास काळे, वसीम पठाण, जनार्दशन गिराम,
ज्ञानोबा काकडे, अशोक राजेजाधव, संतोष खरात, नरहरी तांगडे, राजेंद्र तांगडे, प्रभु बम्हे, रजनिश कनके, सुनिल मिसाळ, श्याम राठोड, अर्जुन ठोंबरे, श्रीराम कान्हेरे,सुदाम काळे, कृष्णा खांडेकर,  जीवन खंडागळे,शंकर जाधव, दिपक खरात, हरी शेळके, रमेश वर्‍हाडे, संदीप सदावर्तेे, समाधन सवडे, संदीप काकडे, अंकुश पवार, मधुकर खरात, किसान राठोड, केशव क्षिरसागर, संजय जाधव, एन.डी. कडोस यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची
उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे