pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

तत्कालीन तलाठी पंडित विठ्ठल झेंडेकर आणि मंडळ अधिकारी एम के पाटील यांना अटक होणार

मौजे दिघोडे तालुका उरण जिल्हा रायगड येथील प्रकरण

0 1 2 1 0 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22

मौजे दिघोडे तालुका उरण येथील फेरफार क्रमांक 1281 दिनांक 4/3/1983 अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी ह्या आदिवासी व्यक्तीची पाच एकर जमीन बिगर आदिवासी व्यक्ती तुळशीराम बाबू घरत, भरत बाबू घरत, अंकुश बाबू घरत, लहू बाबू घरत यांच्या नावे वारसा हक्काने अवैध्य रित्या हस्तांतरित करण्यात आली. ती जमीन सन 1996 मध्ये घरत कुटुंबीय यांनी कैलास सुर्वे यांना विकली. रायगड जिल्ह्यातील ह्या गाजलेल्या प्रकरणात एट्रोसिटी ॲक्ट अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पनवेल सेशन्स कोर्टाने घरत कुटुंबीय आणि कैलास सुर्वे यांचा जामीन अर्ज फेटाळला असून घरत कुटुंबीय मागील दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत.कैलास सुर्वे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तपास अधिकारी न्हावा शेवा पोर्ट विभागचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी उत्कृष्ठ रित्या तपास करून माहिती गोळा केली आहे. प्रमुख आरोपी असलेले तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांचा तपास लागला असून त्यांना 41( अ) प्रमाणे नोटीस दिलेल्या असून चौकशी साठी बोलावले होते. परंतु ते तेंव्हा पासून फरार असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत. अशी माहिती न्हावा शेवा पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 7