योग साधना परिवार सोनल नगर तर्फे पुरुषांसाठी घेण्यात आलेल्या सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद

जालना/प्रतिनिधी, दि.15
योगाच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या योगसाधना परिवारातर्फे दिनांक 15 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी सहा वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर सोनल नगर येथे सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावर्षीचे हे दुसरे वर्ष होते.
या स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून
श्री बाळासाहेब खरात (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ,जालना ) श्री विपुल भागवत सर (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली)
श्री एम जी जोशी साहेब (सेवानिवृत्त जेष्ठ अधिव्याख्याता राज्य आंग्लभाषा विभाग) श्री डॉ संजयजी येवते सर (जेष्ठ अधिव्याख्याता ,डाएट संभाजीनगर)
डॉ चारुदत्त हवलदार (जिल्ह्यातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट तथा संचालक विवेकानंद हॉस्पिटल ,जालना) डॉ सौ चारूस्मिता हवलदार ( अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन, जालना जिल्हा) डॉ सौ मधुरा बोठे(होमियोपॅथी तज्ञ तथा उत्कृष्ट योग शिक्षिका)
डॉक्टर आर डी सचदेव ( बालरोग तज्ञ तथा संचालक विवेकानंद हॉस्पिटल जालना, तसेच अध्यक्ष सिंधी समाज जालना) श्री संजय देठे सर (लेखा परीक्षक, जालना)
श्री दादासाहेब भुतेकर (अध्यक्ष श्री संत गजानन महाराज संस्थान ,सोनलनगर) यांची उपस्थिती होती
डॉ मकरंद बोठे यांचे नित्य, नि:शुल्क योगसाधना परिवार चालवण्याचे कार्य कौतुकास्पद आहे ,हे सूर्यनमस्कार शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे मत श्रीमान बाळासाहेब खरात (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना) यांनी व्यक्त केले
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम असून तो प्रत्येकानेच केला पाहिजे डॉ बोठे साहेबांच्या सांगण्यानुसार सर्वांनी नियमित 12 सूर्यनमस्कार करावेत आहाराचे नियोजन ठेवावे व मी सुद्धा नियमित सूर्यनमस्कार करनार असे मत विपुलची भागवत (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, हिंगोली) यांनी व्यक्त केले
सर्व स्पर्धकांनी मनापासून केलेले सूर्यनमस्कार पाहून सूर्यांनीच सर्व स्पर्धकांना आज नमस्कार केला आहे, आपणास उदंड आयुष्य प्राप्त होवो व सुदृढ आरोग्य प्राप्त होवो अशी कामना श्रीमान एमजी जोशी साहेब यांनी व्यक्त केली
सध्याच्या स्पर्धेच्या व गतिमान युगात प्रत्येकानं आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार करावेत असे मत डॉ संजयजी येवते साहेब यांनी व्यक्त केले
सूर्यनमस्कार हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ऋषी संस्कृती पासून चालत आलेला नियमित व्यायाम प्रकार आहे .त्यायोगे उत्तम आरोग्य साधता येते व शरीरातील वाढलेली चरबी कमी होते. शुगर कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते .ऍसिडिटी ,वारंवार होणारी सर्दी कमी होऊन मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असा व्यायाम आहे……. असे मत आय एम ए जालना चे अध्यक्ष डॉ सौ चारु स्मिता हवालदार यांनी व्यक्त केले…….
या स्पर्धेत मुख्य योगशिक्षक तथा होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर मकरंद बोठे यांनी आहार, ‘सूर्य नमस्कारचे शरीरावरील परिणाम’ याबद्दल मार्गदर्शन केले .
चि शशांक संजय देठे यांनी नियमित 108 सूर्य नमस्कार 108 दिवस केल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
सूर्य नमस्कार स्पर्धेमध्ये
14 ते 34, 35 ते 54 व 55 ते 70 आणि 70 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक असे वयोगट करण्यात आले होते. प्रत्येक वयोगटात तीन बक्षिसे काढण्यात आली प्रोत्साहन पर प्रत्येक वयोगटात काही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
त्याचा निकाल खालील प्रमाणे.
वय वर्ष 14 ते 34 वयोगट
श्री आकाश लक्ष्मण सपकाळ( प्रथम)
श्री श्रेयश मनोज लंके( द्वितीय)
श्री शशांक संजय देठे, (तृतीय)
वय वर्ष 35ते 54वयोगट श्री गणेशराव डोईफोडे (प्रथम)
श्री बी एस पाल( द्वितीय)
श्री दीपक उदावंत (तृतीय) श्री प्रमोद नाईक( प्रोत्साहन पर बक्षीस)
वयोगट 55ते 70
डॉ सखाराम किंगरे साहेब (प्रथम)
श्री प्रमोद शुक्ला (द्वितीय) श्री शंकर एनगुपटला ( तृतीय)
श्री रंगनाथ पोपळघट (प्रोत्साहनपर बक्षीस)
……. वय वर्षे 70 व त्यापुढील वयोगट
श्री रंगनाथ कापसे (प्रथम) श्री विठ्ठल सुरकुटवार (द्वितीय)
श्री भारत लोकुलवार( तृतीय)
श्री राजपाल पारचा (प्रोत्साहन पर बक्षीस)
श्री पांडुरंग काटकर (प्रोत्साहन पर बक्षीस) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री प्रमोद नाईक व श्री महेश वझरकर यांनी केले
…… गटशिक्षणाधिकारी श्रीमान रवी जोशी साहेब यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले..,.
स्पर्धेनंतर आरोग्यदायी नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योग साधना परिवाराच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.


