राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी अभिवादन
नवी दिल्ली, 23
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम, सारिका शेलार व अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सुभाषचंद्र बोस आणि
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित माहिती अधिकारी यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.