pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बेरोजगारांसाठी 12 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन

0 1 7 3 7 3

जालना/प्रतिनिधी,दि. 6 

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक- युवतींना विविध खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापनाकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्याकडून जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सांस्कृतिक सभागृहात बुधवार दि.12 एप्रिल 2023 सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बेरोजगार उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मेळाव्यात विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि. बोरखेडी, सिंदखेड राजा रोड, जालना यांची दहावी किवा बारावी व आयटीआय फिटर/मशिनिष्ट/ इलेक्ट्रिशियन मशिन ऑपरेटर 10 पदे, पदव्युत्तर पदवी साठी एचआर ट्रेनर 2 पदे, फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रा.लि., जालना यांची दहावी किंवा बारावी ईपीपी ट्रेनी 10 पदे. दहावी/आयटीआय फिटर/ टर्नर/ मशिनिष्ट/ वेल्डर/ इलेक्ट्रिशियन ईपीपी ट्रेनि 60 पदे, पदविका इंजिनिअर इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल/ इलेक्ट्रोनिक & टेलिकम्युनिकेशन ट्रेनी 25 पदे, पदवीधर (बीए/बीकॉम/बीएसस्सी) ट्रेनी 20 पदे, पदवीधर इंजिनिअर इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन ईपीपी ट्रेनी 25 पदे, आणि टॅलेंसेतु सर्व्हिसेस प्रा. लि. पुणे यांची पदविका इंजिनिअर मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन मशिन ऑपरेटर 20 पदे, दहावी/आयटीआय मशिनिष्ट/ फिटर/ इलेक्ट्रिशियन/ वेल्डर/ डिजल मेकॅनिक/ मेकॅनिक मोटर व्हेईकल मशिन ऑपरेटर 20 पदे, दहावी/बारावी/ पदवीधर असेंबली लाइन ऑपरेटर 20 पदे अशी एकूण 212 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत.

याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरी साधक) लॉगिनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-1 (2023-241) जालना याची निवड करावी. उद्योजक / नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान तीन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आदी कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रतीचा संच सोबत ठेवून बुधवार दि. 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे