pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नागरिकांना जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन; डोळ्यांच्या संसर्गावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करा

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.28

जिल्ह्यामध्ये कंजक्टीवाईटीस म्हणजेच डोळ्याच्या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळुन येत आहेत. डोळे येणे (कंजक्टीवाईटीस ) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. कोणालाही डोळे येण्याचा त्रास जाणवत असल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार करुन घेणे गरजेचे आहे. तरी डोळ्यांची दृष्टी कमी होणे व कायम दृष्टी जाणे यासारखी गुंतागुत होण्यापुर्वी डोळ्यांच्या संसर्गावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. जी. डी. म्हस्के यांनी केले आहे.
डोळे येणे (कंजक्टीवाईटीस ) हा हा मुख्यत्वे अॅडीनो व्हायरसमुळे होतो. जो विशेषतः पावसाळ्यात होतो. यालाचा पिंक आय असे देखील म्हणतात. कधी-कधी दोन्ही डोळयांना देखील होतो. या आजारात डोळयाना खाज, चिकटपणा, डोळ्यांना सुज, डोळे लालसर होणे, डोळयातून पिवळा द्रव बाहेर येणे आदी लक्षणे असतात. डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असला तरी यामध्ये वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे. या आजाराकरीता ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात तसेच उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक ती सर्व औषधी आणि उपचार उपलब्ध आहेत.
नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन घरासह परीसरात स्वच्छता राखावी, हात नियमित धुवावेत, डोळ्यांना हात लावु नये, आजार झालेल्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात जाऊ नये, शाळा, वस्तीगृहे, अनाथालय अशा ठिकाणी साथ असेल तर डोळे आलेल्या मुलांना किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. डोळ्यांचा हा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असला तरी यामध्ये वैद्यकिय सल्ला पावसाळ्यामुळे चिकचिक, घरगुती माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर वेळीच उपाययोजना करणे अशी खबरदारी घ्यावी. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4