पत्रकारिता क्षेत्रात अद्ययावत आणि तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याची सुसंधी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था या अग्रगण्य शिक्षण संस्थेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, मराठी भाषेची गोडी असणाऱ्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम( पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट – मराठी) गेल्या २७ वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे. मुद्रित, दृक श्राव्य तसेच वेब प्रसारमाध्यम क्षेत्रात वार्ताहर, उपसंपादक, संपादक, भाषांतरकार, वृत्त निवेदक, कंटेंट रायटर्स , ब्लॉग रायटर्स, जनसंपर्क अधिकारी, इव्हेंट मॅनेजर अशा नानाविध करिअरच्या संधी देणारा हा एक वर्ष कालावधीचा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत चालविला जातो. माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ पत्रकार या वर्गात मार्गदर्शन करत आहेत. पदवी नंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी, अन्य ठिकाणी नोकरी करत शिकू इच्छिणारे विद्यार्थी किंवा पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिणारे कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र असतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली असून शनिवार दिनांक ३ मे रोजी सकाळी ११ वाजता गरवारे संस्थेत ऑफलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : श्रीमती.नम्रता कडू, वर्ग समन्वयक, मराठी पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट.
संपर्क क्रमांक- 7977489076/
8591590174