ब्रेकिंग
जाफ्राबाद तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन
0
3
8
6
5
4
जालना/प्रतिनिधी,दि. 26
सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत जाफ्राबाद तालुक्यात एकुण 20 हजार 672 लाभार्थी आहेत. त्यापैकी दिव्यांग लाभार्थी 1 हजार 303 असून युडीआयडी व आधार संलग्नीकरण 403 लाभार्थ्यांचे यशस्वीरित्या पुर्ण झाले आहे. जे अत्यंत कमी आहे. त्यामुळे जाफ्राबाद तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी क्रमांक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि ई- आधारकार्ड तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात स्वत: जमा करावेत, जर लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली नाही तर त्यांचा लाभ कायमचा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन जाफ्राबाद तहसीलदार डॉ.सारिका भगत व नायब तहसीलदार मंगेश साबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
8
6
5
4

