सेझ प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
जेएनपीए सेझमध्ये चालू असणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये (कामांमध्ये) बेलपाडा व सावरखार गावातील ५० % व इतर तीन गावातील सोनारी करळ जसखार ह्या गावातील ५० % बेरोजगार तरुणांची भरती झाली पाहीजे असे असताना बीव्हीजी व गार्डन तसेच सुरक्षा रक्षक यामध्ये ब-याच प्रमाणात बाहेवरील भरती झाली आहे तरी बाहेरील बेरोजगारांची भर्ती बंद करून स्थानिक तरुणांना या कामामध्ये सामावून घ्यावे तसेच वॉटर सप्लाय मधील कामांमध्येही स्थानिक तरुणांना रोजगार दयावा अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे ग्रामसुधारणा मंडळ बेलपाडाच्या वतीने करण्यात आली आहे.ग्रामसुधारणा मंडळ बेलपाडाचे सचिव अतिश पाटील , सहसचिव बी. एन. देशमुख,खजिनदार संतोष म्हात्रे , खजिनदार महेश पाटील , करळ गावचे अध्यक्ष भानुदास तांडेल,बेलपाडा,सावरखार सोनारी जसखार गावचे महिला कामगार या सर्वांनी एकत्र येत सेझचे व्यवस्थापकीय प्रमुख श्री. बोरवणकर, सचिव मनिषा जाधव (जेएनपीए ) यांची भेट घेउन त्यांना निवेदन देउन स्थानिकांची सेझमध्ये भरती करणाची मागणी केली. सर्व बाजू ऐकून घेवून सर्व प्रकल्पग्रस्तांना बेलपाडा, सावरखार गावातील प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल. बाहेरील कामगार काढून टाकणार. ठेकेदारावर स्वत: लक्ष ठेवणार असे आश्वासन जेएनपीएचे सचिव मनिषा जाधव यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना दिले.