जालना पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.7
पब्लिक स्कूल व गोदावरी इंग्लिश स्कूल चे पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले.यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.प्रेक्षकांनीही विद्यार्थ्यांना भरभरून रोख स्वरूपात बक्षीस देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांची वाहवा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री बाबुराव गावडे सचिव जालना पब्लिक स्कूल यांनी भूषविले .उद्घाटन श्री भाऊसाहेब घुगे शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख जालना यांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री सर्जेराव शिंदे सरपंच इंदेवाडी, श्री किशोर पांगारकर नगरसेवक जालना, श्री मनोहर उघडे श्री सुमित वाघमारे ग्रामपंचायत सदस्य इंदेवाडी ,श्री अभिजीत कावले, सुनील भारती पत्रकार, संदीप बेराड,श्री चव्हाण सर, श्री फकीरा वाघ, श्री सुखदेव भुंबर यांची उपस्थिती होती. पत्रकार श्री सुनील भारती यांनी मंगल भूमी न्यूज चॅनल या वाहिनी वरती सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण केल्यामुळे जे कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाही अशा पालकांनाही कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,नियोजन, प्राचार्य श्रीमती किर्ती पवार यांनी तर सूत्रसंचालन नेहा राठोड आणि सविता राठोड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपाली हजारे ,अनिता काळे,पूजा औरंगे,ऋतुजा हिवाळे,वर्षा कांबळे ,प्रार्थना शेटे,अश्विनी हिवराळे,सुषमा सोनवणे,आरती नागरे, प्रियंका उगले,तसेच सेविका भाग्यश्री दवे,अर्चना वाहूळ,जिजाबाई खैरे,वर्षा दळवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल शाळेचे संचालक श्री प्रमोद पवार, दीपक गावंडे, दत्ता पवार, अशोक पवार, शालिकराम पवार,प्रदीप पवार यांनी प्राचार्य व सर्व स्टाफ चे अभिनंदन केले आहे.



