कौटुंबिक परिवारात रामचंद्र कपिले यांचा लग्नाचा वाढदिवस उत्साहात संपन्न

पुणे/ आत्माराम ढेकळे,दि.1
पुणे — ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र कपिले व सौ.उषाताई कपिले यांचा लग्नाचा ५१ वा वाढदिवस कौटुंबिक परिवारात उत्साहात संपन्न झाला.अनेकांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे शुभेच्छा व्यक्त केल्या.
कौटुंबिक परिवारातील प्रेम,जिव्हाळा या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पाहण्यास मिळाला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र कपिले यांच्या या सोहळ्यात मुले ,मुली,सुना,नातवंडे,जावई,मेव्हणे आदी नातेवाईक आप्तेष्टांचा समावेश होता.या लग्न वाढदिवस सोहळ्याचे आयोजन त्यांची मुले श्रीपाद कपिले व मंगेश कपिले यांनी पुणे येथे या आगळ्या वेगळ्या कौटुंबिक जिव्हाळ्यात आयोजन केले.या सोहळ्यात पारंपारिकरित्या ११ महिलांनी औक्षण केले तसेच याप्रसंगी ५१ दिवे लावण्यात आले होते.सर्वांनी आनंदाने संगीतमय वातावरणात शुभेच्छा दिल्या. प्रामुख्याने मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे समवेत मधुकर टोंपे,नामदेव सुवर्णकार ,नारायण उदावंत तसेच कोथरुडचे सामाजिक कार्यकर्ते माधवराव दहिवाळ परिवारासह उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थितांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
सद्य युगात अशा लग्नाच्या वाढदिवस कार्यक्रमात सर्व नातेवाईक एकत्र येऊन प्रेम ,जिव्हाळा व्यक्त करतात .ही कौतुकाची बाब आहे.श्री.रामचंद्र कपिले व सौ.उषाताई कपिले यांनी आपला संसार ५०+ वर्ष (अर्धशतकाने पार) सुख,समाधानाने करुन विशेषतः नाते जोपासले ही अभिनंदनपर बाब आहे. अशाच नात्यात प्रेम ,जिव्हाळा कायम राहावा .व हे भावी पीढीसाठी मार्गदर्शक ठरेल.असे पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.तर सामाजिक कार्यकर्ते माधवराव दहिवाळ यांनीही आपल्या शुभेच्छापर मनोगतात असा कौटुंबिक जिव्हाळ्याचा लग्न वाढदिवस प्रथमच पाहण्यास मिळाले असल्याचे समाधान पुर्वक सांगुन या सोहळ्यात नातेवाईक व्यतिरिक्त आम्हास सहभागी केले असल्याबद्दल धन्यवाद दिले. शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.