जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये वार्षिकदिन व पारितोषिक वितरण २०२४ सोहळा मोठया उत्साहात साजरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत असलेल्या कै गो.ना.अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये वार्षिकदिन व पारितोषिक वितरण २०२४ सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कमांडर सनद पाटील आयएनएस तुनिर करंजा ,माजी उप सभापती वैशाली निलेश पाटील, संचालक मंडळ सदस्य श्री.मेटकरी सर,शशिकांत पाटील,संकुलातील सर्व मुख्याध्यापक माजी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.