द्रोणागिरी स्पोर्टसच्या महादेव घरतांनी प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे. – कामगार नेते एड सुरेश ठाकूर

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
द्रोणागिरी स्पोर्टस उरण यांनी उरणकरांना मैदान हवे , यासाठी आक्रमक आंदोलन छेडले आहे.या आंदोलनात कोमसाप कवींचा कवितांचा जागर घालून मैदानाच्या हक्काचे
आवाजातून महादेव घरत यांनी
मूलभूत प्रश्नांला जबरदस्त हात घातला आहे.त्यांना न्याय हे मिळणारच असेही नव्या मुंबईतील सुप्रसिद्ध कामगार नेते सुरेश ठाकूर यांनी भेंडखळ या गावी जाहीर सभेत विचार मांडले
“उरणकरांना मैदान द्या” या
आंदोलनाचे, द्रोणागिरी स्पोर्टस उरणचे अध्यक्ष महादेव घरत यांनी बिगुल वाजविले असून तालुक्यातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे माहितीसह स्पष्टिकरण आपल्या भाषणात केले.
कवितांच्या जागरात ” सिडकोला उलटा टांगणार “या कवितेने रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांनी जागराची भूमिका मांडली आणि आगरी बोलीत पसायदान गाऊन सादर केले.अनिल भोईर,भरत पाटील, अक्षता गोसावी,प्रा.चंद्रकांत मढवी,न.ग.पाटील इत्यादी कवींनी अक्षरशः जागरात गोंधळ घातला.प्रांजळ भोईर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक मच्छिंद्र घरत यांनी केले तर स्वागत किरण घरत यांनी केले.ग्रा.पं.सदस्या संगीता भगत यांनी आंदोलनास भेंडखळ ग्राम पंचायतीचा पाठिंबा जाहीर केला.
यावेळी विजय ठाकूर, लखूशेठ ठाकूर, यशवंत ठाकूर प्रकाश घरत, गणेश घरत, भालचंद्र भगत, नासिकेत म्हात्रे, पांडुरंग पाटील, गणेश घरत,दीपक ठाकूर,रेखा घरत, मेघश्याम भगत, अशोक ठाकूर इत्यादी प्रमुख ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी परीक्षेत विशेष गुणांनी यश मिळविल्याने
दिव्या भगत आणि रिवा घरत या विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.