pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू त्वरित लागू करावा – मराठवाडा शिक्षक संघाची मागणी

0 4 0 7 5 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दि.१ जुलै २०२५ पासून लागू झालेला ३ टक्के वाढीव महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-प्राध्यापक व सेवानिवृत्त कर्मचारी यांना त्वरित लागू करावा असी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने राज्याचे मुख्यमंत्री व संबंधीतांकडे केली आसल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी दिली आहे.
याबाबत अघाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बाजारात होत असलेली प्रचंड महागाई वाढ लक्षात घेऊन केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दि.१ जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. त्यांच्या महागाई भत्ता ५५ टक्क्यावरुन ५८ टक्क्यांवर गेला आहे. तर राज्यातील कर्मचारी व शिक्षकांना अद्याप ५५ टक्केच महागाई भत्ता मिळत आहे.केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून आज जवळपास सात महिने झाले आहेत. तरी राज्यशासनाकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करण्याची हालचाल दिसून येत नाही. केंद्रा प्रमाणे वेतन व भत्ते देण्याचे राज्यसरकारचे सुत्र आसून केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते लागू केले की राज्य सुध्दा त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी करत असते. परंतू सदरील ३ टक्के वाढीव महागाई भत्ता सात महिने होऊन गेले तरी तो अद्याप पर्यंत लागू केला गेला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.तरी राज्यसरकारने या मागणीची तात्काळ दखल घेऊन राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-प्राध्यापक व सेवानिवृत्त कर्मचारी यांना ३ टक्के वाढीव महागाई भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने १ जुलै २०२५ पासून लागू करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधीतांकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मागणी पत्रकावर मराठवाडा शिक्षक संघाचे *मार्गदर्शक* पी.एस.घाडगे, व्ही.जी.पवार, *अध्यक्ष* सुर्यकांत विश्वासराव, *सरचिटणीस* राजकुमार कदम, *उपाध्यक्ष* ज्ञानोबा वरवट्टे, गुट्टे एस.जी.*कोषाध्यक्ष* औताडे ए.बी.,सहसचिव पवार टी.जी.,माळी एन.जी.,श्रीमती रेखा साळुंखे, *केंद्रीय कार्यकारणी सदस्य* बंडू अघाव, अशोक मस्कले, मधुकर जोंधळे, रातोळे जी.जी.,कुरेशी ए.ए.,राठोड पी.आर.,सुर्यवंशी आर.एन.,कदम व्ही.जी.,कौशल्य जी.पी.,पाटोदेकर ए.डी.,सोळंके एन.टी.,वऱ्हाड बी.ए.,तिर्थकर एस.एस.,जमादार एफ.बी.,पाटील पी.एस.यांच्यासह *जिल्हाध्यक्ष* कालीदास धपाटे, व्यंकटराव चिलवरवार, बसवेश्वर माने,शेरखाने जे.एस.,रमेश आंधळे, जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमोडे, यशवंत मकरंद, हरिभाऊ भडके, हाळदे के.एम. *जिल्हासचिव* गणेश आजबे, रविंद्र वाकोडे, भाई चंद्रकांत चव्हाण, माने जी.व्ही.,विक्रम मायाचारी,To पाटील, बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक डी.जी.तांदळे यांची नावे आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे