ब्रेकिंग
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण
0
1
1
8
3
4
औरंगाबाद/प्रतिनिधी,दि.1
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी अभिवादन केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त पी.जी.वाबळे, सहाय्यक लेखाधिकारी एस.आर.चाटे, आणि प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0
1
1
8
3
4