*केंद्रात भाजपाचे नऊ वर्ष सेवा, सुशासन गरिब कल्याणकारी योजना लाभार्थी माहिती व्हावी या निमित्ताने लाभार्थी संमेलन नविन कौठा नांदेड येथे संपन्न*

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.30
नांदेड शहरात नवीन कौठा नांदेड येथे भाजपा कामगार आघाडी चे धडाडीचे नेते सुरेश लोट यांनी मतदार राज्याला भाजपा चे केंद्रीय सरकारने केलेल्या कार्याचे माहिती शासकिय सवलतीची माहिती व्हावी म्हणून सेवा, सुशासन , गरिब कल्याण लाभार्थी संमेलन आयोजित केले होते.
या कार्यक्रमाला नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते
कार्यक्रमाला दिप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करून सुरूवात झाली.
प्रस्ताविक शिवा लोट यांनी या.पंतप्रधान यांनी नऊ वर्षांत देशाची कशी प्रगति केली त्याबद्दल माहिती दिली.
अनेक मान्यवरांनी भाजपा नी केलेल्या कार्याची माहिती दिलि.
या. खासदार प्रतापराव पाटील यांनी मा.पंतप्रधान मोदि जगाला भारताची ओळख करून दिली व जनतेच्या खात्यात अनेक योजना टाकल्या मुळें कोणाला कोणती योजना मिळाली आहे ते इतरांची दुकानदारी बंद झाली असेच विकासाची सेवा करण्याची संधी भाजपाला देऊन येणाऱ्या निवडणुकीत मोदींचे हात बळकट करण्यासाठी आतापासूनच मतदार राज्यानी जागृत व्हावे असे आव्हान अनेक वक्त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलिप ठाकूर तर आभार सुरेश लोट यांनी मानले.
या कार्यक्रमाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रविण साले, दिलीप ठाकूर, दिलीप कंदकुर्ते,राजु गोरे,चैतन्य बापू देशमुख, अशोक मामा मोकळे, शितल खंडिल,किशोर यादव, चंचल, डॉ सचिन ऊमरेकर, अशोकराव जाधव, चंपतराव डाकोरे टाकसर, इत्यादी
सुरेश लोट , पत्रकार मतदार नागरिक उपस्थित होते.
असे प्रसिद्धी पत्रक शिवचरण लोट यांनी दिले.