राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.3
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.
बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, तंबाखूमुक्त तसेच आरोग्यसंपन्न समाजासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यासोबतच विविध स्वंयसेवी संस्था, शाळा यांनी सक्रिय सहभाग घेवून प्रभावी जनजागृती करावी. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. तसेच तंबाखुमुक्त शाळा अभियान यशस्वीरीत्या पुर्ण करण्यासाठी तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था या मार्गदर्शक सुचनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शहरी आणि ग्रामिण भागात अवैधरित्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, असे सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
बैठकीस अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक संगिता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अतुल राजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, सायकॉलॉजीस्ट सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे व ग्रामीण विकास संस्थेचे विभागिय व्यवस्थापक मंगेश गायकवाड इ. सदस्य उपस्थित होते.


