शेतकऱ्यांच्या विहिरीवरील चोरीस गेलेले ६ वीज पंप ५८,८००/-₹ चा मुद्देमाल केले जप्त. परतूर पोलिसांची कारवाई.

विरेगाव/गणेश शिंदे, दि.21
शेतकरी मोठ्या मेहनतीने आपल्या विहिरीवर विजपंप बसवतो आणि आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी तयार असतो परंतु वीज पंप चोरीला गेले की पिकाला पाणी देणे बंद होते आणि नवीन पंप विकत घेणे मंजे पुन्हा विनाकारण पैसे खर्च , अशा परिस्थितीत परतूर शहरातील तसेच रायपूर, आनंदवाडी, जुना मोंढा परिसरातून काही शेतकरी यांच्या मोटारी वीज पंप चोरीस गेले होते, त्याबाबत त्यानी पोलिस स्टेशन येथे चोरीची तक्रार दिली होती त्या प्रमाणे विविध गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यांच्या तपासा दरम्यान आज रोजी परतूर पोलिस यांना गोपनीय माहिती मिळाली त्या वरून आरोपी नामे १) गणेश आसाराम ढवळे २) सुनील आसाराम माने ३) दिलीप विठ्ठल बिडवे सर्व रा. साईनगर परतूर. यांना ताब्यात घेतले असता वरीप्रमाणे वीज पंप चोरून नेले बाबत सांगून ६ वीजपंप किंमत ५८,८००/-₹ चा मुद्देमाल समक्ष काढून दिला असून एका गुन्ह्यातील लोखंडी अँगल सुद्धा चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपी विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी साहेब, अधीक्षक जालना, मा. डॉ. श्री. राहुल खाडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री बुधवंत साहेब, Dysp परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोउपनि अंभोरे, पोह/धर्मा शिंदे, पो ना/ अशोक गाढवे, पोका / दीपक आडे, पोका/किरण मोरे, पोका/ गजानन राठोड, पोका/ दशरथ गोपनवाड, पोका/ सतीश जाधव यांनी केली आहे.