संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेसाठी इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.29
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुला- मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत घनसावंगी व परतूर या तालुक्याच्या मुख्यालयी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या दोन इमारती (मुलां- मुलींसाठी स्व तंत्र इमारती) भाडे तत्वावर घ्यावयाच्या आहेत. या इमारतींना सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दराने इमारत भाडे देय राहील. तरी ज्या व्यक्तींकडे सर्व सुविधा असलेल्या इमारती उपलब्ध आहेत, अशा इमारत मालकांनी सुट्टीचे दिवस वगळून सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.