pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी वाहतुकीच्या मार्गात बदल

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 26

जालना जिल्ह्यात कोजागिरी पोर्णिमा हा सण साजरा होत आहे. त्याअनुषंगाने अंबड हद्दीतील मत्स्योदरी देवी मंदीर येथे कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी दर्शनी यात्रा भरुन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमत असते. मत्स्योदरी देवी मंदीरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असुन अवजड वाहनांच्या रहदारीमुळे अपघात घडू शकतो, त्यासाठी भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षीततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील अवजड वाहनांना शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत.
जालना येथून अंबडमार्गे बीडकडे जाणारी वाहने व बीडवरुन अंबडमार्गे जालनाकडे येणाऱ्या अवजड वाहनांना दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पारीत केले आहेत. यामध्ये बीडकडुन अंबडमार्गे जालनाकडे येणारी अवजड वाहने ही (शहागड, हरीओम हॉटेल वडीगोद्रीसमोरील उड्डाणपुलाचे खालुन, पाचोड, अंबड, गोलापांगरीमार्गे जालनाकडे जातील.) तसेच जालनाकडुन अंबडमार्गे बीडकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. घनसावंगीकडुन अंबडमार्गे जालनाकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी, गुरुपिंपरी, राणीउंचेगाव, राणीउंचेगाव फाटा, अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप समोरुन, गोलापांगरी मार्गे जालनाकडे जातील.) जालनाकडुन अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. घनसावंगीकडुन अंबडमार्गे शहागडकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी, तिर्थपुरी, सुखापुरी, सुखापुरी फाटा, वडीगोद्री, यामार्गे शहागडकडे जातील.) शहागडकडुन अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे