“ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर ” या उपक्रमाव्दारे होणार महिलांच्या समस्यांचे निराकरण समस्याग्रस्त व पिडीत महिलांना अर्ज करण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.17
महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतुन समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपयायोजना म्हणुन तालुकास्तरावर ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर ” या उपक्रमाद्वारे महिलांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जालना जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्त्रीशक्ती समाधान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबीर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या शिबीरासाठी सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहेत. त्याअनुषंगाने अंबड येथे दि. 19 मे 2023 रोजी, जालना येथे दि. 23 मे रोजी, भोकरदन येथे दि. 24 मे रोजी, परतुर येथे दि. 25 मे रोजी, जाफ्राबाद येथे दि. 26 मे रोजी, बदनापूर येथे दि. 29 मे रोजी, मंठा येथे दि. 30 मे रोजी आणि घनसावंगी येथे दि. 31 मे 2023 रोजी. ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर ” होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी आर.एन. चिमंद्रे यांनी दिली. या शिबीरास संबधीत तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती राहणार असून पिडीत महिलांच्या समस्यांचे निराकरण जागेवरच करण्याचा प्रयत्न करण्यात करणार आहे.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन घेण्याकरीता आपापल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करुन शिबिराच्या किमान एक दिवस अगोदर आपली समस्या विहीत अर्जाद्वारे दाखल करावी जेणेकरुन शासकीय यंत्रणेकडून निवारण करण्यासाठी सोईचे होईल. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.