तोष्णीवाल महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

हिंगोली/प्रतिनिधी, दि.2
दि.02-10-2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन ड – झोन बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेत विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील मुले ११ संघ व मुली ०९ संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. तळणीकर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून ड- झोनचे चेअरमन डॉ. मीनानाथ गोमचाळे, डॉ. आनंद भट्ट, डॉ. संतोष कोकीळ,डॉ. विनोद गणाचार्य,डॉ. चंद्रकांत सातपुते, डॉ. गुणाजी नलगे,डॉ. माधव कदम हे उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगतात समन्वयक प्रा.हेमंत शिंदे यांनी बॅडमिंटन या खेळाचे महत्व विषद करत सदर स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला.
स्पर्धेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. एस.जी. तळणीकर यांनी सदर स्पर्धेचे उद्घाटन केले आणि प्रत्येक खेळाडूंशी हितगुज साधत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
सदर स्पर्धेमध्ये मुले गट प्रथम क्रमांक श्री. शिवाजी महाविद्यालय,परभणी यांनी,नूतन महाविद्यालय,सेलू यांनी द्वितीय तर बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मुली गटा मधे प्रथम क्रमांक सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,कुर्तडी यांनी तर द्वितीय क्रमांक श्री.शिवाजी विधी महाविद्यालय,परभणी यांनी तर तृतीय क्रमांक नूतन महाविद्यालय, सेलू यांनी पटकाविला.
सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ.के.के कदम,श्री. अमोल ओझलवार, पठाण नवाज,महेंद्रकर ऋषिकेश, पठाण नावेद यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या कार्यक्रमाचे संचलन प्रा.टी. यु. केंद्रे यांनी तर आभार क्रीडा विभाग प्रमुख प्रा. हेमंत शिंदे यांनी व्यक्त केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच महाविद्यालयीन खेळाडूंनी मेहनत घेतली.