३७ व्या गोशीन रियू कराटे कॅम्प चे उदघाट्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
गोरबंजारा ज्ञानपीठ लोधिवली येथे गोशीन रियू कराटे असोसिएशन चे ३७ वे राष्ट्रीय कराटे ट्रेनींग कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.या कॅम्प मध्ये मुलांना लाठीकाठी, तलवार, नानचाकू, स्टोनफा, कराटेच्या विविध कौशल्ये शिकविल्या जातात व आपली मुले सक्षम बनवून ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेवलला कशी खेळू शकतात यांचे संपूर्ण मार्गदर्शन दिले जाते. या शिबिरामध्ये उरण, पनवेल पेण ,खोपोली,लोधिवली,उलवा नोड, रसायनी या ठिकाणाचे ७० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.या शिबिराचे उदाघाट्न उद्योगपती व समाज सेवक किसन भाऊ राठोड याच्या हस्ते करण्यात आले.ह्या कॅम्पचे आयोजन सिहान राजू कोळी सर इंडिया प्रेसिडेंट यांनी केले आहे. तसेच गोपाळ म्हात्रे,परेश पावसकर, भूषण म्हात्रे, भूपेंद्र माळी , रेश्मा माळी , अंजा माने, रियाज अन्सारी, सुलभा कोळी,निकिता कोळी,शितल गणेशकर, राकेश म्हात्रे, विघ्नेश कोळी, अमिता घरत, प्रशिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.