pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना शहरातील मोकाट कुत्र्यांसाठी राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध देण्याची मागणी

0 3 2 9 1 6
जालना/प्रतिनीधी,दि.30
महा लोकाधिकार सेनेच्या वतीने जालना महानगर पालीकेला एका निवेदनाव्दारे शहरातील मोकाट कुत्र्यांसाठी राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन महानगरपालीकेचे विजय फुलंब्रीकर यांनी स्विकारले, निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, देशातील ख्यातीप्राप्त जालना महानगरपालीकेच्या हद्दीमध्ये शहरातील विविध ठिकाणी अनेक मोकाट कुत्र्यांचे झुंडीच्या झुंडी आपणास पहावयास मिळत आहेत, शहरातील नागरीकांमुळे या कुत्र्यांना रस्त्यावर भटकंती करण्यासाठी तसेच आपले अन्न शोधण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे, खासकरून रात्रीच्या वेळेस जेव्हा ही कुत्री सामुहीकरित्या अन्न शोधत असतांना जेव्हा एखादा मोटारसायकलस्वार यांच्या समोरून किंवा बाजुन जातो तेव्हा यांना नाहक त्या गाडीवाल्याच्या पाठीमागे पळावे लागते, यामुळे अनेक वेळा गाडीस्वार पडुन जखमी होतो, त्याचा दोषही विनाकारण या कुत्र्यांवर येतो, तसेच शहरातील अनेक छोटी मोठी मुले यांना अनेक वेळा दगड मारून हुसकावुन लावण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्या कुत्र्यांनी अनेक वेळा लहान मुलांचा चावा घेतल्याची घटना घडुन येत आहे.
अत्यंत अहिंसक असलेले कुत्रे शहरातील नागरीक व लहान मुलांमुळे हिंसक होत आहेत. अशा अहिंसक व लुप्त होत चाललेल्या या कुत्र्यांना सांभाळायची नैतीक जबाबदारी जालना महानगरपालीकेचीे असल्यामुळे आम्ही आपणास नम्र निवेदन करतो की, शहरात महानगरपालीकेच्या अनेक जागा खाली असुन या जागी या कुत्र्यांसाठी व त्यांच्या परीवारासाठी राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच त्यांच्यासाठी त्यांच्या सोयीनुसार व त्यांच्या आवडीचे जेवण सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच त्यांना त्रास देणार्‍या शहरातील नागरीक व लहान मुले यांच्यावर योग्य ति कार्यवाही करण्यात यावी.
अर्जाचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन पुकारावे लागेल व यास आपण पुर्णतः जबाबदार राहताल असे हि नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख चाँद पी.जे., वरिष्ठ उपाध्यक्ष शेख अहेमद, महासचिव शेख मतीन, अजीम खान, बशीर खान, शेख महेजबीन, अशफाक पटेल, नवीद काजी आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे