pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भव्य अश्या वटवृक्षाची लागवड करून उभारली निसर्ग संवर्धनाची अनोखी गुढी !

0 1 7 4 7 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

उरण तालुक्यातील सारडे गावं आणि सारडे गावांतील एक सामाजिक मंडळ गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सन ११ मे १९८९ साली स्थापन झालेलं हे मंडळ येत्या ११ मे रोजी आपला ३७ वां वर्धापन दिन साजरा करणार आहे.या ३७ वर्षात आज पर्यंत मंडळाच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक,कला, क्रीडा,निसर्ग संवर्धन,निसर्गसंरक्षण,दुर्ग संवर्धन,स्वच्छ्ता अभियान मोहीम,वृक्ष लागवड अभियान अश्या अनेक प्रकारची समाजपयोगी कार्य साकारणारं आणि सामाजिक दायित्व जपणारं हे मंडळ आणि या मंडळातील सर्व होतकरू पदाधिकारी,सदस्य मंडळी यांच्या वतीने एक अनोखं आणि आदर्शवत असं कार्य साकारलं गेलं ते म्हणजे शिशिर ऋतू संपताच वसंत ऋतूच आगमन होते.आणि झाडां – वेलींना नवी पालवी येते फुलां – पानांनी बहरणाऱ्या सृष्टीचे नवचैतन्य न्याहाळत चैत्र शु.१ श्री शालिवाहन शके १९४६ हिंदू नवंवर्ष साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थात गुढीपाडवा आणि याच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे यांच्या वतीने निसर्ग संवर्धनाची एक अनोखी गुढी उभारण्यात आली ती म्हणजे सारडे गावाच्या तलाव शेजारी असणाऱ्या वडाच्या पारावर ( ज्या पाराच्या मध्यभागी असणारा शेकडो वर्षा पूर्वीचा भव्य असा वटवृक्ष मागील काही वर्षा पूर्वी सुकून उन्मळून पडल्याने )त्याच ठिकाणी एका मोठ्या अश्या वटवृक्षाची लागवड करण्यात आली. ज्या मुळे गावांतील महिला भगिनींना वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा देखील करता येईल आणि पुढे जाऊन त्या वटवृक्षाच्या माध्यमातून लोकांना शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळेल त्या लागवड केलेल्या वटवृक्षाच्या ठिकाणी बांधलेला भव्य असा पार सुध्दा गोल्डन ज्युबली मित्र मंडळाने आपल्या मंडळाच्या स्वखर्चातून आणि श्रमदानातून सन १९९० साली बांधलेला आहे.

गोल्डन ज्युबळी मित्र मंडळाच्या वतीने गुडीपाडवाच्या दिवशी ज्या मोठ्या अश्या वटवृक्षाची लागवड करण्यात आली तो वटवृक्ष देखील उरण – कळंबुसरे गावातील नाना मंगळू पाटील या निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्वाने आपल्या मनाचे मोठेपण दाखवत त्यांच्या कडून भेट स्वरूपात देण्यात आला. जो त्यांनी देखील पाच वर्षापूर्वी आपल्या घराशेजारी लागवड करून जतनं करून ठेवला होता पण गोल्डन ज्युबली मित्र मंडळाच्या या संकल्पनेला आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्याला एक अनोखी अशी भेट म्हणून त्या वटवृक्षाचे झाड सस्नेह भेट म्हणून देण्यात आले आणि गोल्डन ज्युबली मित्र मंडळाच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक अनोखी अशी निसर्ग संवर्धनाची गुढी उभारण्यात आली. वटवृक्ष लागवडीच्या या आदर्शवत अश्या कार्यात खूप अशी मेहनत आणि परिश्रम घेतले ते गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे अध्यक्ष हिराचंद म्हात्रे,उपाध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच शशिकांत म्हात्रे,माजी अध्यक्ष नवनीत पाटील,खजिनदर संजिव माळी, कार्याध्यक्ष देविदास पाटील, सल्लागार दिनेश म्हात्रे आणि या कार्यात खास अशी उपस्थिती आणि परिश्रमरुपी सहकार्य सारडे गावचे माजी उपसरपंच श्यामकांतजी पाटील यांचे लाभले.या सर्व मंडळींच्या परिश्रमातून आणि संकल्पनेतून गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक अनोखी अशी निसर्ग संवर्धनाची गुढी उभारण्यात आली.ज्याचं आज सर्व स्तरांतून कौतुक केलं जातं आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे