भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द येथील शेतकरी रावसाहेब वराडे यांच्या शेतामधील दोन एक्कर मक्काला गंजीला लागलेल्या आगीमुळे मोठे
आर्थिक नुकसान झाले असून या शेतकर्याला तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदन उपतालुकाप्रमुख
अर्जुन ठोंबरे यांनी केली आहे.नळणी येथील शेतकरी रावसाहेब धोंडीबा वराडे यांची २ एक्कर शेतामधील
मक्याचा गंजीला लागलेल्या आगीत शेतकर्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान आहे.त्यामुळे आज शिवसैनिक व उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी शेतात जावून
पाहणी करुन शेतकर्याला धीर देत झालेल्या नुकसानीचा मोबदला शासनाने तात्काळ देण्याची मागणी केली आहे.