अमरावती एमआयडीसी परिसरातील बनावट दारूचा कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.15
अमरावती : अमरावती येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेला बनावट देशीदारू कारखाना पोलीस प्रशासनाच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे.
अमरावती एमआयडीसी परिसरातील बनावट दारूचा कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त
अमरावती येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेला बनावट देशीदारू कारखाना पोलीस प्रशासनाच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत १० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा बनावट देशी दारू निर्मिती करणारा कारखाना सुरू होता. एमआयडीसीतील बंद कारखाना भाडेतत्वावर घेऊन तेथे एका नामांकित देशी दारू ब्रँडची कॉपी करून बनावट दारू निर्मिती व विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.