pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरुन आलेले व त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते, स्टार प्रचारकांना मतदारसंघात राहण्यास प्रतिबंध

0 1 7 9 4 6

जालना/प्रतिनिधी,दि.8

जालना लोकसभा मतदार संघ निवडणूकीकरीता 13 मे रोजी मतदान होणार आहे. या  मतदारसंघामध्ये जालना जिल्हयातील जालना, बदनापूर व  भोकरदन या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 126 मधील तरतुदीनुसार मतदान बंद होण्याच्या वेळेपासुन 48 तास अगोदर संबंधित मतदारसंघात प्रचाराचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे मतदारसंघा बाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते तसेच स्टार प्रचारक इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहु नये व अशा राजकीय व्यक्तींनी व स्टार प्रचारकांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदारसंघ सोडावा, असे  निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती व प्रचाराकरीता आलेले स्टार प्रचारक हे कायद्यानुसार निर्धारित निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा मतदारसंघात राहील्यास त्यांच्याकडून प्रचार मोहिम राबविली जाण्याचा संभव आहे. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजेच दिनांक 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजेनंतर     18 – जालना लोकसभा मतदारसंघातील  जालना, बदनापूर व  भोकरदन या विधानसभा मतदारसंघातील मतदार नसलेले आणि बाहेरून आलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कायकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती व प्रचाराकरीता आलेले स्टार प्रचारक यांना जालना जिल्हयाच्या सीमेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात येते.

हा आदेश दिनांक 11 मे 2024 रोजीचे सायंकाळी 6.00 वाजेपासुन ते दिनांक 13 मे 2024 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अमंलात राहील. हा आदेश 18 – जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनीधी यांना लागू होणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे