लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, वाटूर तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

विरेगाव /गणेश शिंदे, दि.18
वाटूर येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे जिल्हा व्यवस्थापक श्री.जोमलिंग मस्ती सर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकांनाही निमंत्रित करण्यात आले होते.
आर्थिकदृष्ट्या गरीब व शेतमजूर कुटुंबातील मुलांना शिकवून त्यांना शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या स्कुल बॅग्स,शैक्षणिक साहित्य,शालेय गणवेश पुरवण्याबरोबरच या मुलांसाठी वर्षभर मोफत शिकवणी देऊन लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. या निरागस बालकांच्या चेहेऱ्यावरील हास्य हीच आमच्या संस्थेसाठी प्रेरणा आहे असे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे श्री बी.डी. सोनकांबळे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
सुरुवातीला जान्हवी वायाळ या विद्यार्थिनीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी शंभू महादेव महाविद्यालय वाटूरचे प्राचार्य श्री.आदबने सर,लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे श्री.जनार्दन राठोड सर,श्री.प्रल्हाद खरात सर आदींनी विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले.तर साक्षी माने या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.