pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ तर्फे शैक्षणिक साहित्य भेट.

0 3 8 3 5 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 9

आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळा गव्हाण आणि कोपर ह्या शाळामध्ये मंडळाचे संस्थापक सचिन राजे येरुणकर यांच्या वतीने स्पीकर, एमलीफायर मशीन, प्रिंटर आणि माईक देण्यात आले. त्यावेळी विजयशेठ घरत (मा. उपसरपंच ), माई ताई भोईर (सरपंच ), सुहास देशमुख, संदीप पाटील,रोहन खंडू, साई पैकडे,कीर्ती फाटक, रचना येरुणकर,सरिता साळवे, सुप्रिया सावंत,नम्रता मुरकर,संध्या पाटील, सोनाली ठाकूर, सविता दवे आदी मान्यवर उपस्थित होते.आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळाच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. या वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या विषयावर जनजागृती सुद्धा केली जाते. त्यामुळे आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळने आयोजित केलेल्या सर्वच उपकमांना जनतेचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे