टेंभूर्णी येथे ३४ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम, भक्तांची गर्दी
जाफराबाद/विशाल देशमुख,दि 11
टेंभूर्णी: आत्मानंद सरस्वती रंगनाथ महाराज यांच्या ११० व्या पुण्यतिथीनिमित्त टेंभूर्णी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने येथील खलसे गुरुजी यांच्या मळ्यातील रंगनाथ महाराज मंदिर परिसरात रोज भागवत कथा, काकडा, आरती, रंगनाथ महाराज चरित्र गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ व हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
या सप्ताहाला सोमवारी प्रारंभझाला. दररोज रात्री ८ ते १० या वेळात
महाराज पिंपळे, बाळू महाराज नाईक, होणाऱ्या कीर्तनात निवृत्ती महाराज कोरडे, विठ्ठल महाराज जगताप, नारायण ज्ञानेश्वर झगरे गुरुजी, श्रीपाद मुळे महाराज, भगवान महाराज गाडेकर, रघुनाथ महाराज देशपांडे आदींची कीर्तन सेवा होणार आहे. शिवाय दुपारी अशोक जोशी, रघुराम उखर्डे, रवी महाराज, विनायक गुरू, राज गोविंद प्रभू, गोविंद दत्त प्रभू, डॉ. देवपती प्रभू आदींची प्रवचन सेवा होणार आहे.
रघुनाथ महाराज देशपांडे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर सोमवारी महाप्रसादाने सांगता होणार आहे. या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटीचे दगडुबा खलसे, गणपत भिताडे, राजू करवंदे आदींसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
११०
व्या रंगनाथ महाराज यांची पुण्यतिथी व संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने ३४ वर्षांपासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले जाते.
संत रंगनाथ महाराज यांनी स्वतः आपल्या जीवनातील काही कार्यकाळ येथील खलसे गुरुजी यांच्या मळ्यात घालविला होता. त्यांच्याबाबत अनेक चमत्कारीक आख्यायिका गावकरी आजही सांगतात. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा भक्त परिवार परिसरात आहे.
