जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सुयश कॉलेजमध्ये राज्यस्तरीय ई-पोस्टर स्पर्धा आयोजित
प्रतिनिधी/विशाल देशमुख,दि.17
टेंभुर्णी जिजामाता ग्रामीण विकास संस्था संचलित वरूड बुद्रुक ता. जाफ्राबाद येथील सुयश कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने “जागतिक फार्मासिस्ट दिना ” निमित्ताने राज्यस्तरीय ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षीचा विषय “थिंक हेल्थ,थिंक फार्मासिस्ट” असा असून स्पर्धेसाठी विविध उपविषय निवडण्यात आले आहेत. त्यात पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन, पेशंट काऊन्सेलिंग, हर्बल कॉस्मेटिक्स, कॉमन डिसीज मॅनेजमेंट, औषधांचा तर्कसंगत वापर, आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टची भूमिका व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील फार्मासिस्टची वाढती भूमिका अशा विषयांचा समावेश आहे.
नोंदणी व ई-पोस्टर सादरीकरणाची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे, तर निवडलेल्या पोस्टर्सची घोषणा 24 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. विजेत्यांना पहिल्या क्रमांकासाठी ₹१००१/- व दुसऱ्या क्रमांकासाठी ₹५०१/- रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
या स्पर्धेत डी. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. नोंदणी गुगल फॉर्मद्वारे करावी लागणार असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. निवडलेले पोस्टर्स ऑनलाईन सादरीकरणासाठी ठेवले जाणार आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्राचार्य डॉ. विजय आर. पवार, सहसंयोजक डॉ. रवींद्र डी. मापारी असून, प्रा. हर्षल लहाने हे सह-संयोजक म्हणून कार्यरत आहेत.