pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषदेच्या शाळेतून देखील उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन- विनोद कळंबे.

0 4 1 0 2 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.21

डावरगाव देवी जिल्हा परिषद शाळेत स्नेह संमेलन उत्साहात संपन्न. टेंभुर्णी (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या शाळेतून देखील उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जाफराबाद तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन विनोद कळंबे यांनी केले.डावरगाव देवी ता. जाफराबाद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्य उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जाफराबाद पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी रामकुमार खराडे, आदर्श शिक्षक जमीर शेख, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सखाराम नवले,अशोक हरकळ ,डी. के.खरात, दगडुबा देठे, टेंभुर्णी केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक, डावरगाव देवीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्राम संसद सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, पोलिस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री कळंबे यांनी जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थानी साथ देण्याचे आवाहन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,लोकगीते, हिंदी,मराठी चित्रपट गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.अंगणवाडीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ही एक नृत्य यावेळी सादर केले.यावेळी गावातील सर्व गावकरी मंडळी, तरुण मित्र मंडळ, महिला भगिनी, पालक वर्ग व विद्यार्थी या सर्वांची उपस्थिती लक्षणीय होती. उपास्थित रसिक प्रेक्षकांनी तब्बल 45 हजार रुपयांच्या बक्षिसाची उधळण केली.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक महेश अहिरे, प्रभाकर बनकर, आश्रुबा बुरकुल, नानासाहेब कोरडे , सुनिल पवार, धनंजय आढाव, रिबिका साने यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आश्रुबा बुरकुल यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 2 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे