pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नायगाव तालुक्यातील भोपळा येथील तरुण शालेय विद्यार्थ्यांची चिठ्ठी लिहून आत्महत्या, शासन किती तरुणाचा बळी घेणार ? चंपतराव डाकोरे पाटिल

0 1 7 4 1 5

नांदेड/ प्रतिनिधी,दि.23

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात शांततेच्या मार्गाने सनदशीर आंदोलन केले जात असताना शासन लक्ष देत नसल्यामुळे मराठा योध्दा मनोज पाटिल जरांगे यांनी शासनास जागे करण्यासाठि सतरा दिवस अमरण ऊपोषण करीत असता महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने जाहिर पाठिबा देऊन साखळी ऊपोषण,अमरण ऊपोषण, करीत असता या.मुख्यमंत्री साहेब आपण प्रत्यक्ष मनोज पाटिल यांना एका महिन्यात आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्यावेळि चाळिस दिवसांचा कालावधी देऊनही करोडो मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सभा घेऊन शक्ति दाखविली तरी कुंभकर्ण शासन जागे होत नसल्याने महाराष्ट्रातील तरूण आपल्याला कोणत्याही सवलती,क्षिक्षण शिकुन स्पर्धेत तयारी करुन आरक्षण नसल्यामुळे आरक्षणवाले कमी टक्केवारीत शासकिय नौकरीत तर आम्हा सवलती नौकरीत सवलत नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक तरूण आपले जिव देत आहे तर एका दिवसात नांदेड जिल्ह्यात दोन तरूनानी आपला जीव दिला त्यात नायगाव खै. तालुक्यातील भोपाळा येथील एका अठरा वर्षे वयाच्या तरुण शालेय विद्यार्थ्यांनीफिस भरण्याची ऐपत नसल्याने व मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या करत असल्याची चिठि लिहुन दि.22 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आत्महत्या केली.
सविस्तर माहिती अशी की भोपाळा तालुका नायगाव येथील ओमकार आनंदराव बावणे वय वर्षे 18 हा तरुण शालेय विद्यार्थी येथुन जवळच असलेल्या शंकरनगर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत होता.घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे आईवडील मोल मजूरी करून त्यांला शिक्षणासाठी शाळेत पाठवत होते परंतु आई वडीलांची होणारी हालॶपेष्टा पहावत नाही यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मि माझे बलीदान देत आहे असी चिठ्ठी लिहून गावाशेजारी जंगलीपिर मंदिराच्या विहिरीच्या काठावर चिठ्ठी लिहून ठेउन विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
ओमकार आनंदराव बावणे हा 22 ऑक्टोबर रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तो शेतात कामाला गेला होता तो दिवसभर काम करून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी ऐउन घराबाहेर गेला तो सात वाजेपर्यंत आलाच नसल्याने त्यांच्या आईने शोध घेतला असता तो गावाशेजारी जंगलीपिर मंदिराच्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
हि घटना घडल्याचे समजताच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आतापर्यंत शेकडो मराठा तरूनानी जीव दिला.
आता शासन कधी जागे होनार आणखी किती जनांचा जीव घेणार आता तरी शासन जागे होऊन सकल मराठा समाजाला न्याय हक्क द्यावा मराठा समाजाचा अंत पाहु नये असे प्रसिध्दीपत्रक दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचेलीकर यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे