ग्रामपंचायत पागोटे आणि ग्रामस्थ मंडळ पागोटे यांच्यातमार्फत शिवजयंती साजरी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
ग्रामपंचायत पागोटे आणि ग्रामस्थ मंडळ पागोटे च्या वतीने पागोटे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजीचा नारा देण्यात आला.यावेळी पागोटे ग्रामपंचायत सरपंच कुणाल पाटील,उपसरपंच सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य मयूर पाटील,सुजित तांडेल, आदिराज पाटील, सदस्या -प्राजक्ता पाटील,करिष्मा पाटील, सुनिता पाटील, सोनाली पाटील, समृद्धी पाटील, ग्रामविकास अधिकारी अनिता म्हात्रे, पागोटे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष-प्रकाश भोईर,शिवसेना व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक,ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.