pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विद्यार्थी हेच राष्ट्राची संपत्ती होय –दिलीप सोनवणे (नायब तहसीलदार जालना)

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी, दि.2

शेलगाव : येथील जिजाऊ इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या नवरंग वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांच्या हस्ते व दानकुंवर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक महेंद्रजी गुप्ता, मेस्कोचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके व मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तुळशीराम पाटील शेळके यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थी हेच राष्ट्राची संपत्ती असून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे व सुजान नागरिक बनवणे हेच शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन काय तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे 2010 पासून सातत्याने शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कर्तुत्ववान व आदर्श व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिला जातो. चालू वर्षाचे कै. नारायणराव पाटील वाळके जालना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री सुभाष जानकीराम पारे (जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा), श्रीमती शुभांगी नारायणराव येमूल (मुख्याध्यापिका, विठ्ठल प्राथमिक व माध्यमिक शाळा, चंदनझिरा), श्री सुभाष नामदेव दाभेराव (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदोला), श्रीमती वैशाली दौलतराव देवरे (सहशिक्षिका, जिल्हा परिषद कन्या प्रशाला जालना), श्रीमती सोनाली मिलिंद खेरुडकर (सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाणेवाडी), श्री विनोदकुमार विक्रम पांडे (सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विल्हाडी), श्री संदीप रामभाऊ नवगिरे (सहशिक्षक श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामनगर), विनोद चोबे (सहशिक्षक, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल जालना), श्री डीगांबर धोंडीबा गाडेकर (सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशनगर), श्री पांडुरंग दादासाहेब गंगणे (सहशिक्षक, शिवाजी विद्यालय, रोशनगाव) आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व पुरस्कारार्थींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण समितीच्या अध्यक्षपदी गजानन पाटील वाळके तर समितीमध्ये शंकरसिंह ठाकूर, शंकर शेरे, मनीषा पाटील, बबनराव बोरुडे, प्रशांत नवगिरे, विष्णू सोनटक्के व ढाकणे सर यांनी निवड करण्यासाठी प्रयत्न केले.
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीतगायन, समूहनृत्य, अभिनय, कलाकृतीसह
विविध गाण्यावर ठेका धरत उत्कृष्ट समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी अनेक पालक बंधू-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शंकरसिंह ठाकूर, कृष्णा पाटील एखंडे, सुलोचनाताई शेळके, अध्यक्ष कविता गजानन वाळके, सचिव अनिकेत गजानन वाळके, प्रशांत नवगिरे, सतीश नागवे, सोनाजी नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, सर्व शिक्षक तथा विद्यार्थी जिजाऊ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेलगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे