pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमीत तालूकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गटविकास अधिकारी व गट शिक्षणअधिकारी यांच्या समन्वयाने आयोजन.

0 1 1 8 3 4

बदनापूर/प्रतिनिधी, दि.19

आज (दि.18) रोजी बदनापूर येथे गटविकास अधिकारी व गट शिक्षणअधिकारी यांच्या समन्वयाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमीत तालूकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मा. आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला.

यावेळी सकाळी 9.30 वा सत्यागृह / स्वच्छता रॅली काढण्यात आली रॅलीला मा शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ साहेब मा. ज्योती राठोड गटविकास अधिकारी बदनापूर, मा. दता क्षिरसागर गट शिक्षणाधिकारी बदनापूर उपस्थित होते. सकाळी 11.30 वा स्मृतीस्थळ टाकळी कोलते येथे तालुक्यातील ५० विद्यार्थ्याना बसने मा. गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. तेथे मुलांना स्मृती स्थळाची व स्वांतत्र्य सैनिकानी केलेल्या कार्याची माहीती देण्यात आली . त्यानंतर 12 वा मा नारायण भाऊ कुचे यांच्या अध्यक्षतेखाली तालूका स्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा साठी मा अति मुकाअ बनसोडे व मु.ले. व वि अ राजू सोळंके, मा ज्योती राठोड, दत्ता क्षिरसागर उपस्थित होते दुपारी 4 वा विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पदक देवून सन्मानित करण्यात आले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पं स मधील सर्व वि अ / सर्व . कर्मचारी / शिक्षण विभागातील सर्व अधिकारी /कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . शेवटी सर्व उपस्थित मान्यवराचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4