pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आतापर्यंत 19 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल आज 24 नामनिर्देशन पत्रांची विक्री

0 1 7 6 8 6

जालना/प्रतिनिधी,दि. 24

18-जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदारसंघातून आज एकूण 14 जणांनी 24 नामनिर्देशन पत्र खरेदी केले. आज दि. 24 एप्रिल अखेर उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी एकूण 102 जणांनी 234 फॉर्म घेतले. आज 10 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 19 उमेदवारांनी 28 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
आज रावसाहेब दादाराव दानवे (भारतीय जनता पार्टी), कल्याण वैजिनाथराव काळे (इंडियन नॅशनल काँग्रेस), मनोज नेमिनाथ कोलते (अपक्ष), चाबुकस्वार राहूल निरंजन (अपक्ष), सुपडू आत्माराम पाटील (अपक्ष), विकास छगन लहाने (अपक्ष), बनेखाँ नूरखाँ पठाण (आझाद स्वाभिमानी सेना), बाबासाहेब संतुकराव शेळके (समता पार्टी), शिवाजी उत्तम भारस्कर (अपक्ष), प्रभाकर देवगण बकले (वंचित बहुजन आघाडी) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, जालना यांनी कळविली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 6 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे