ब्रेकिंग
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ; विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारण्याकरिता मुदतवाढ

0
3
1
5
3
3
जालना/प्रतिनिधी,दि. 26
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2022-23 मधील अर्ज 31 मार्च 2023 पर्यंत स्विकारण्यात आले आहेत. तथापी, विदयार्थी, पालक, विविध संघटनेमार्फत विदयार्थ्याचे अर्ज स्विकारण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विदयार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने सदर योजने अंतर्गत सन 2022-23 मधील प्रवेशित विदयार्थ्याचे अर्ज स्विकारण्याकरीता दिनांक 14 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
1
5
3
3