नेर जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत नियुक्त मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षण्ा झालेल्या शिक्षकाची नेमणूक केली आहे. ती रद्द करुन उर्दू माध्यमाच्या शिक्षकाची नियुक्ती करण््याची मागणी पालक आणि शलेय व्यवस्थापन समितीचे अध््यक्ष आिण सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण््यात आला आहे.
जालना तालुक्यातील नेर येथे जि. प. उर्दू उच्च प्राथमिक शाळा असून येथे वर्ग इयत्ता १ ते ८ असे एकूण आठ वर्ग आहेत. या शाळेत इंग्रजी, हिंदी आणि मराठी विषय सोडून इतर सर्व विषय उर्दू भाषेत शिकवले जातात. उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, कला आणि कार्यानुभव हे सर्व विषयांचे माध्यम उर्दू असून यांची पाठ्यपुस्तके सुद्धा उर्दू भाषेत आहेत. आपण या शाळेवर इयत्ता सहावी ते आठवी या वर्गावर शिकविण्यासाठी उर्दू माध्यमातून न शिकलेल्या पदवीधर शिक्षकाची नियुक्ती केलेली आहे. शाळेवर इयत्ता ६ वी ते ८ वीला शिकविण्यासाठी संच मान्यतेनुसार केवळ दोनच जागा मान्य असून, एक जागा रिक्त आहे. त्यामुळे नियुक्त केलेल्या शिक्षकाला सर्व विषय शिकवावे लागतील तसेच एक पदवीधर शिक्षकाची जागा भरल्यावर सुद्धा मराठी व इंग्रजी विषयासोबत इतर उर्दू भाषेत शिकवले जाणारे विषय शिकवावे लागतील. जे शिकविण्यासाठी उर्दू माध्यमातून न शिकलेले व शिक्षणाच्या कोणत्याही स्तरला उर्दू विषय न शिकलेले पदवीधर शिक्षक पात्र होऊच शकत नाही. नियुक्त केलेले गैर उर्दू माध्यमातून शिकलेले पदवीधर शिक्षक इयत्ता सहावी ते आठवीचे सर्व विषय शिकवण्यास पात्र नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ चे उघ्ाडपणे उल्लंंघन होत आहे.तरी आपण शाळेवर उर्दू माध्यमानतून न शिकलेल्या पदवीधर शिक्षकाला शाळेवर रुजू न करता त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करावी. तसेच शाळेवर उर्दू माध्यमने शिकलेले किंवा उर्दू विषय शिकलेले शिक्षकची नियुक्ती करावी, अशी विनंती निवदेनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी गट शिक्षणाधिकारी वाजेद भाई, विपूल भागवत, शरपू भाई,विजय राठोड, अमान भाई.मुख््तार शेख,अल्ताफ भाई, आजू सय्यद, शारेख खान, उर्दू शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.