गाणार -पोतदार परिवारातील शुभविवाह व स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

पुणे /आत्माराम ढेकळे,दि.2
पुणेः- येथील श्री.संतोष दिवाकरराव गाणार (रा.साखरखेर्डा ,ह.मु.पुणे )यांचे चिरंजीव संकेत आणि वरुड, जि.बुलढाणा येथील श्री.विलास कृष्णराव पोतदार यांची सुकन्या चि.सौ.कां.रिया (पल्लवी) यांचा शुभविवाह समृध्दी मंगल कार्यालय,भोकरदन येथे दि.२०मे २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.तर स्वागत समारंभाचेही आयोजन पुणे येथे उत्साहात करण्यात आले होते.
भोकरदन येथील आयोजित शुभाविवाह प्रसंगी चि,संकेत आणि चि.सौ.कां,रिया या वर-वधुस शुभेच्छा व आशिर्वाद देण्यासाठी समाजातील निमंत्रित मान्यवर,नातेवाईक ,पाहुणे ,मित्र ,आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये प्रामुख्याने गुरु स्थानी असलेले श्री.बबनराव कोंडोपंत कपाळे,वैश्य सुवर्णकार समाज,छत्रपती संभाजीनगर चे अध्यक्ष संजय कमलाकरराव सराफ,वैश्य सुवर्णकार समाज युवक मंडळ,छ.संभाजीनगर चे सचिव वामन लक्ष्मणराव सराफ,सुवर्णकार समाज,पुणे चे उपाध्यक्ष शामराव सारंगधरराव पावटेकर,साखरखेर्डा निवासी शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र श्रीधरराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्वांचे गाणार आणि पोतदार परिवारातील सर्व व्यवस्थापक ,कार्यवाहक ,स्वागतोत्सुक सदस्यांनी स्वागत केले या शुभविवाह प्रसंगी ज्येष्ठ नातेवाईक व्यक्ती त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमती पुष्पाताई दिवाकरराव गाणार (आजी) ,सौ.चित्ररेखाबाई कृष्णराव पोतदार व श्री.कृष्णराव सखाराम पोतदार (आजी,आजोबा) यांचे वर -वधुनी आशिर्वाद घेतले.या भव्य शुभविवाह समारंभात विशेषतः भजन गायक नागेश पळसकर यांनी सुमधुर आवाजात भजन,भावगीत,चित्रपटगीत सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्थ केले.तर पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीतुन समारंभात निवेदन केले.सर्वांनी यांचे उत्स्फुर्तपणे कौतुक केले.तसेच पुरोहितांनी मंगलाष्टके नाविन्यपुर्वक सादर केले.तर समारंभात ‘गंगाआरती नृत्य ‘चे विशेष आकर्षण होते.या शुभविवाहासाठी विविध ठिकाणाहुन आलेल्या निमंत्रित अतिथींनी वधु -वरास शुभेच्छा ,शुभाशिर्वाद दिले.तर पुणे येथे दि.२६ मे२०२५रोजी श्रीजी बॕक्वेट लाॕन्स ,बिबवेवाडी येथे “स्वागत समारंभ “आयोजित करण्यात आला होता.या समारंभात स्थानिक सराफा व्यापारी,कारागीर ,नातेवाईक ,मित्र ,आप्तेष्ट असे अनेक मान्यवर गाणार व पोतदार परिवारसह मोठ्या” संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये प्रामुख्याने सुवर्णकार समाज,पुणेचे अध्यक्ष सतिशशेठ उमाकांतराव चिखलठाणकर ,पुणे कार्यकारिणी पदाधिकारी आदींनी चि.संकेत आणि चि.सौ.का.रिया (पल्लवी)या वर-वधुस शुभेच्छा व शुभाशिर्वाद दिले.प्रामुख्याने वैश्य सोनार समाज अनंतसागर सेवा प्रतिष्ठान,छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष मनोहरराव एकनाथराव कपाळे यांनी न्युयाॕर्क येथुन (परदेशातुन) गाणार व पोतदार परिवारातील वर -वधुस शुभविवाह ,स्वागत समारंभ प्रसंगी आशिर्वादपर सुखी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.