pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

चौकशीचे अहवाल आठ दिवसांत सादर करा – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना  

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.10

जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारीमध्ये काही ठिकाणी भ्रष्टाचार झालेला किंवा काम गुणवत्तापूर्वक झाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होतात, अशा प्रकरणात आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना  यांनी आज सर्व विभाग प्रमुखांना दिले.
जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनात त्या  बोलत होते. या वेळी परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरे- चाटे, यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. आज झालेल्या तक्रार निवारण दिनात एकुण २१ तक्रारी  प्राप्त झाल्या,  त्यात  पंचायत विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य विभाग, नरेगा विभाग  तसेच  शिक्षण विभाग यांचा समावेश होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सर्व प्रथम मागील ३ तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीचा आढावा घेतला. २ जानेवारी रोजी झालेल्या तक्रारी दिनात एकूण २१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यातील १५ निकाली निघाल्या असून ६ प्रलंबित आहेत तर फेब्रुवारी दरम्यान झालेल्या एकूण १६ तक्रारी पैकी ४ निकाली निघाल्या असून अ२ प्रलंबित आहेत तसेच मार्च महिन्यातील तक्रार दिनी एकूण २३ प्राप्त तक्रारी पैकी १८ निकाली काढल्या असून ५ प्रलंबित असल्याचे दिसून आले. ज्या तक्रारी प्रलंबित आहेत, एक तर त्याची चौकशी सुरु आहे किंवा न्याय प्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले. विहित मुदतीत प्रकरणे निकाली काढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तक्रार निवारण दिनात जास्त वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी पेक्षा बोगस काम झाले, भ्रष्टचार झाला अशा तक्रारी जास्त प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्यामुळे त्याचा निपटारा करणे लवकर शक्य होत नसल्यामुळे त्यांनी आज सर्व विभाग प्रमुखांना तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेश दिले. तसेच आपण तालुक्यात भेटी देते वेळी याबाबत पाहणी करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट करून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन करून घेतला जाणार नाही, याचा विश्वास तक्रारदारास दिला. तक्रारदारांनी तात्काळ निकाली निघणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या तक्रारी केल्या व त्याचा जागेवरच निकाल दिला तर त्याचा मला अधिक आनंद होईल, असेही त्यांनी  यावेळी नमूद केले.
तक्रार निवारण दिनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी(प) संजय इंगळे, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. डी. एल. कांबळे, समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस के भोजने , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा -स्व) बालचंद जमधडे , कार्यकारी अभियंता विद्या कानडे,  यांच्या सह गटविकास अधिकारी, उप अभियंता ,कक्ष अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी  यांची उपस्थिति होती.
चौकट :
आता पर्यंत एकूण ६० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३७ निकाली काढल्या असून २३ प्रलंबित आहेत. त्याचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वर्षा मीना
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,जालना

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4