दिव्यांग,वृध्द निराधारांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकिचा इतिवृताला केराची टोपली दाखविणाऱ्यावर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कारवाई करा- चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/प्रतिनिधी,दि.6
दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी सात वेळा बैठक दि. १३ सप्टे. २०२४ रोजी संबंधित अधिकारी, दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत सुनावणीचे आदेश, निर्देश व सुनावणी बदल अहवाल पाठविण्याचे अनेक वेळा निर्देश देऊन अद्याप त्यांच्या आदेशाची दखल न घेतल्यामुळे दिव्यांगाच्या प्रश्नाबदल नुतन जिल्हाधिकारी नांदेड यांनी दि.१८ मार्चला बैठक घेऊन विस दिवसांत त्या बैठकिचा ईतिवृत लेखि आदेश वेळेवर निघत नसतील तर अनेक लेखिपत्र अधिकाऱ्यांना मिळत नसतील जर ऊशिरा मिळालेल्या आदेशाकडे कनिष्ठ अधिकारी लक्ष देत नसतील तर त्या
दिव्यांगाना न्याय कधी मिळेल?
दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार सर्व गटविकास अधिकारी यांना दि.२७ फ्रेबु. ते १२ मार्च २०२५ पर्यंत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासहित तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना भेटून
दिव्यांग पडत झडत खर्च करून निवेदन देऊन त्या निवेदनाचे साधे उत्तर मिळत नसेल तर दिव्यांग कायदा? व दप्तर दिरंगाई कायदा कुठे आहे? त्यांची अंमलबजावणी कधी होनार?
मां.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेबांनी नांदेडला आल्याबरोबर कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून तडकाफडकी कार्यवाही केली .
आता खऱ्या ईश्वररूपि दिनदुबळ्याच्या दिव्यांग वृध्द निराधाराना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या कामचुकार,वरीष्ठाच्या बैठकिचे निर्देश, सुनावणीत दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यावर दिव्यांग कायदा व दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे दोषि संबंधित अधिकारी यांच्यावर पंधरा दिवसांत योग्य ते कार्यवाही करून दिव्यांगाना न्याय हक्क नाहि दिल्यास कोणतीही पुर्व सुचना, निवेदन न देता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे त्रिव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाव्दारे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर, मराठवाडा सचिव दिपकराव जाधव यांनी निवासी जिल्हाधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारी सामान्य यांना भेटून निवेदनाद्वारे दिला असे प्रसिध्दी पत्रक दिले.